HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL

HAL Share Price | दिवाळीपूर्वी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे बुधवारी शेअर बाजारावर (NSE: HAL) परिणाम झाला. स्टॉक मार्केट मध्ये रेंजबाउंड ट्रेडिंग होत आहे. उच्चपातळीवरून विक्रीचा दबाव आल्यानंतर अनेक टॉप कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहे. त्यामुळे शेअर बाजार तज्ज्ञ अत्यंत काळजीपूर्वक शेअर्सची निवड करण्याचा सल्ला देत आहेत. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
HAL शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग
शेअर बाजार तज्ज्ञ विजय चोप्रा यांनी डिफेन्स स्टॉक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर पुढे मोठा परत देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. विजय चोप्रा यांनी HAL शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.67 टक्के घसरून 4,532.10 रुपयांवर पोहोचला होता.
तज्ज्ञांनी काय म्हटले?
शेअर बाजार तज्ज्ञ विजय चोप्रा यांनी सांगितले की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीची २-३ प्रॉडक्ट्स अनेक छोट्या आणि मध्यम देशांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने हलके लढाऊ विमान तेजस बनवले आहे. या लढाऊ विमानाच्या सप्लायसाठी अर्जेंटिना, इजिप्त, नायजेरिया, फिलिपाईन्स या देशातून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. त्यामुळे या कंपनीची ऑर्डरबुक अत्यंत मजबूत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
HAL शेअर टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञ विजय चोप्रा यांनी सांगितले की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी ही केंद्र सरकारची टॉप डिफेन्स कंपनी आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 5600 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या किमतीपेक्षा हा शेअर सुमारे २५ टक्क्यांनी वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
मल्टिबॅगर HAL शेअर
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील १ वर्षात १३५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1210.94% परतावा दिला आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.65 टक्के वाढून 4,650.95 रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | HAL Share Price 17 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं