HCC Share Price | मोठी संधी! 31 रुपयाचा शेअर अल्पावधीत देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 32.42 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीची उपकंपनी असलेल्या Steinier AG स्वित्झर्लंड कंपनीने आपल्या इक्विटीच्या निर्गुंतवणुकीसाठी Demathieu Bard सोबत शेअर खरेदी करार संपन्न केला आहे. या कराराचे एकूण मूल्य 928 कोटी रुपये आहे. हा करार डिसेंबर 2023 च्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 31.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 30.55 रुपये या इंट्राडे नीचांक किंमत पातळीवर ओपन झाले होते. आणि काही तासात शेअरची किंमत 32.42 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहोचली होती. तज्ञांच्या मते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर हायर टॉप हायर बॉटम स्ट्रक्चर तयार करत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 28 रुपये ते 26 रुपये किमतीच्या आसपास मजबूत समर्थन पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरची किंमत 57 टक्के वाढली आहे.
डेमॅथियु बार्ड ही कंपनी फ्रान्समधील सर्वात मोठी रिअल इस्टेट आणि बांधकाम कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी मुख्यतः रस्ते, अभियांत्रिकी इमारती, ऊर्जा वितरण, गतिशीलता सुविधा आणि रहिवाशी जागेच्या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. एचसीसी कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 36 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HCC Share Price NSE 06 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं