Hindustan Zinc Share Price | या शेअरच्या खरेदीसाठी गर्दी, 3 महिन्यात दिला 126% परतावा, आली फायद्याची अपडेट

Hindustan Zinc Share Price | हिंदुस्थान झिंक कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीसह ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 683.95 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच हिंदुस्थान झिंक कंपनीने अमेरिकन कंपनी AESir Technologies सोबत करार केला आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हिंदुस्थान झिंक स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 662.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्थान झिंक कंपनी अंश )
AESir Technologies ही अमेरिकन कंपनी मुख्यतः नेक्स्ट जनरेशन झिंक बॅटरी तयार करण्याचा व्यवसाय करते. ही बॅटरी सहज रिसायकल केली जाऊ शकते. या सामंजस्य करारानुसार हिंदुस्थान झिंक कंपनी AESir टेक्नॉलॉजी कंपनीला झिंक तसेच इतर कच्चा माल पुरवठा करणार आहे. झिंक बॅटरी स्वस्त आणि अधिक सक्षम बॅटरी मानली जाते. शिवाय त्याच्या देखभालीचा खर्च देखील खूप कमी असतो. या बॅटरीचे आयुष्य 20 वर्षांपर्यंत असते.
मागील 3 महिन्यांत हिंदुस्थान झिंक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 126 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हिंदुस्थान झिंक स्टॉक 113 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 194 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 807 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 285 रुपये होती. नीचांकी पातळीपासून हा स्टॉक आतापर्यंत 140 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,83,941.44 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hindustan Zinc Share Price NSE Live 22 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं