Home Loan EMI | खराब क्रेडिट स्कोर पडणार महागात, होम लोन EMI साठी 50 लाखांवर अधिक भरावे लागतील 19 लाख रुपये

Home Loan EMI | तुमच्यापैकी बरेचजण एकदा तरी बँकेमध्ये लोन घेण्यासाठी नक्कीच गेले असतील. लोन देण्याचा विचार करण्याआधी बँक तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्याचबरोबर तुमचं फायनल स्टेटस आणि बँक बैलेंस व क्रेडिट स्कोर चेक करते. कारण की लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर बँका सहसा लोन देण्यास सबशेर नकार देतात. तरीसुद्धा काही उलाढाली करून तुम्हाला लोन मिळालं तरी तुमच्याकडून जास्तीच्या व्याजदरानुसार पैसे उकळतात. समजा तुमचा क्रेडिट स्कोर प्रचंड प्रमाणात खराब असेल तर, बँक तुमच्याकडून थेट 10.75% टक्क्यांनी व्याजदर वसुलते. अशातच तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर, 8.35% ने देखील लोन मिळते. जाणून घेऊया खराब क्रेडिट स्कोरमुळे तुम्हाला 50 लाखांवर आणखीन 19 लाख कसे भरावे लागतील.
अशा पद्धतीने वाढू शकते तुमचे कर्ज :
आता तुम्हाला समजेल की, कमी क्रेडिट स्कोर असल्यामुळे तुम्हाला जास्तीची व्याजाची रक्कम कशी भरावी लागते. समजा तुमचा क्रेडिट स्कोर 820 एवढा आहे. अशातच तुम्ही बँकेकडून 50 लाखांचं लोन घेतलं तर, तुम्हाला लोन परतवण्यासाठी 20 वर्षांकरिता 8.35% टक्क्याच्या व्याजदरावर दिले जाईल. ही रक्कम 1.03 करोड रुपये आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला 50 लाख रुपये लोनचे आणि 53 लाख रुपये व्याजाचे परतावावे लागतील. अशा पद्धतीने तुम्ही हप्ता भरण्यासाठी प्रत्येक महिन्याला 42,918 रुपयाची रक्कम भराल.
समजा एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर 580 आहे. तर, 50 लाखांच्या लोनवर त्याला 10.75% टक्क्यांच्या व्याजदरावर लोन दिले जाईल. ही रक्कम 1.21 करोड रुपये होते. म्हणजे तुम्हाला लोनचे 50 लाख रुपये आणि 71.82% रक्कम व्याजाची भरावी लागेल.
कमी क्रेडिट स्कोरमुळे व्याजाची जास्त रक्कम भरावी लागते :
या उदाहरणांवरून तुम्हाला हे समजून आले असेल की, तुमचा सिबिल स्कोर जेवढा कमी असेल तेवढे जास्तीचे व्याजदर तुम्हाला भरावे लागेल. या गोष्टीमुळे तुमच्या हातात खर्चासाठी अजिबात पैसा उरणार नाही. त्याचबरोबर तुम्ही कर्जबाजारी होण्याच्या देखील शक्यता आहेत. तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही बाकी असलेले सर्व पेमेंट भरून टाका. त्याचबरोबर तुमच्या खर्चाचा ताळमेळ सांभाळा. वायफळ खर्च करू नका आणि बजेटमध्ये घर खर्च कसा बसेल याकडे लक्ष द्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Home Loan EMI 02 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं