IRFC Share Vs RVNL Share | मार्ग श्रीमंतीचा! रेल्वेसंबंधित शेअर्स तुफान तेजीत, अधिक फायदा IRFC की RVNL शेअर्सने? डिटेल्स नोट करा

IRFC Share Vs RVNL Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे सेक्टरमधील स्टॉक जबरदस्त तेजीत धावत होते. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल विकास निगम लिमिटेड, RITES लिमिटेड, Titagarh Rail Systems कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पहायला मिळाली होती. या कंपन्याच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, भारत आणि मध्य पूर्वेतील देशांनी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी करार केला आहे. आणि याचा सर्वात जास्त फायदा रेल्वे सेक्टरला होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अमेरिका, सौदी अरेबियासह इतर देश भारतासोबत बंदराच्या माध्यमातून जोडणी करण्याबाबत बोलणी करत आहेत. यामध्ये भारतीय बंदरे आखाती आणि इतर अरब देशांना रेल्वे नेटवर्कद्वारे जोडण्याची योजना आखली जात आहे. या रेल्वे मार्गामुळे आखाती आणि दक्षिण आशिया यांच्यातील व्यापारात वाढ होण्यास मदत होणार आहे.
RITES शेअर्स
शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.70 टक्के वाढीसह 549.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी Rites शेअर 4.80% (NSE सकाळी ९:३० वाजता) वाढीसह 574.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
रेल विकास निगम शेअर्स
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 162.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.75 टक्के वाढीसह 162.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी RVNL शेअर 6.23% (NSE सकाळी ९:३० वाजता) वाढीसह 173.00 रुपयांवर ट्रेड करत आहे.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन शेअर्स
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 77.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.81 टक्के वाढीसह 77.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी IRFC शेअर 7.98% (NSE सकाळी ९:३० वाजता) वाढीसह 83.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
टिटागड रेल सिस्टीम्स शेअर्स
टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 806.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के वाढीसह 807.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी Titagarh Rail Systems शेअर 2.54% (NSE सकाळी ९:३० वाजता) वाढीसह 826.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.
टीटागढ रेल सिस्टिम कंपनी पुढील काळात आपली उत्पादन क्षमता वाढवणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस टीटागढ रेल सिस्टिम कंपनीची उत्पादन क्षमता प्रति मासिक 1000 वॅगन्स पर्यंत पोहोचणार आहे. सध्या टिटागड कंपनी दर महिन्याला 600-700 वॅगन बनवते. भारतीय रेल्वेने टीटागढ रेल सिस्टिम कंपनीला मोठी ऑर्डर दिल्यामुळे कंपनीने देशांतर्गत आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची घोषणा केली आहे. टीटागढ रेल सिस्टिम या कंपनीचे नाव पूर्वी टिटागढ बॅगना होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRFC Share Vs RVNL Share today on 11 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं