Indusind Bank Share Price Today | इंडसइंड बँक शेअरबाबत तज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?

Indusind Bank Share Price Today | ‘इंडसइंड बँक’ ने आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि या खाजगी बँकेच्या शेअर्समध्ये खरेदी सुरू झाली. मार्च 2023 तिमाहीत ‘इंडसइंड बँक’ च्या निव्वळ नफ्यात 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार तज्ञांनी ‘इंडसइंड बँक’ च्या शेअर्सवर 1550 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. (Indusind Bank Limited)
बुधवारी इंडसइंड बँकेचे शेअर्स 1127.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 1,139.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच बँकेच्या प्रवर्तकांना रिझर्व्ह बँकेकडून गुंतवणूक वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तज्ञांचा सल्ला :
इंडसइंड बँकेच्या तिमाही निकालांचे निरीक्षण करणाऱ्या शेअर बाजारातील 33 तज्ञांपैकी 28 जणांनी स्टॉकवर बाय/ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यात 5 तज्ज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार नऊ तज्ञांनी इंडसइंड बँकेच्या शेअरची लक्ष्य किंमत वाढवली असून 16 तज्ञांनी शेअरच्या लक्ष्य किमतीत बदल केला नाही.
परकीय ब्रोकरेज फर्म जेफरीजने ‘इंडसइंड बँक’ च्या शेअर्सवर 1550 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. त्याच वेळी गोल्डमन सॅक्सने या बँकेच्या शेअरची लक्ष्य किंमत 1,411 रुपयांवरून वाढवून 1,522 रुपयेवर नेली आहे. मॉर्गन स्टॅनली फर्मने इंडसइंड बँकेच्या स्टॉकवर 1,525 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
ब्रोकरेज हाऊस CLSA ने देखील स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला देत 1500 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने इंडसइंड बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन शेअरची लक्ष किंमत 1350 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Indusind Bank Share Price Today on 27 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं