Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर

Infosys Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 1.68 टक्क्यांच्या घसरणीसह 1397.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर या स्टॉकमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळाली. मार्च 2024 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 30 टक्के वाढीसह 7,969 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस कंपनीची महसूल वाढ त्याच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आली आहे. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.51 टक्के घसरणीसह 1,411.95 रुपये किमतींवर क्लोज झाला होता.
मार्च 2024 तिमाहीची कामगिरी पाहून तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकची टारगेट प्राइस 1,650 रुपये निश्चित केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने इन्फोसिस स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवली असून टार्गेट प्राइस 1,790 रुपयेवरून कमी करून 1,750 रुपये केली आहे.
नुवामा फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2024-2025 च्या उत्तरार्धात इन्फोसिस कंपनीच्या खर्चात वाढ होईल. त्यासाठी तज्ञांनी या स्टॉकवर 1,720 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
मार्च 2024 तिमाहीत इन्फोसिस कंपनीच्या नफ्यात 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा नफा 6,128 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या तिमाहीत, कंपनीने 1.3 टक्के वाढीसह 37,923 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 37,441 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षात इन्फोसिस कंपनीचा निव्वळ नफा 8.9 टक्क्यांच्या वाढीसह 26,233 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने 24,095 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील आर्थिक वर्षात इन्फोसिस कंपनीने 17.7 अब्ज डॉलर मूल्याचे करार केले होते. यापैकी 52 टक्के सौदे निव्वळ नवीन होते. आता इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक 2023-24 साठी आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर 20 रुपये अंतिम लाभांश आणि 8 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Infosys Share Price NSE Live 20 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं