Integra Essentia Share Price | बापरे! फक्त 12 रुपयाच्या शेअरचा धुमाकूळ, पैसा गुणाकारात वाढतोय, LIC कडून शेअर्सची खरेदी

Integra Essentia Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 500 कोटी रुपये आहे.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स आज आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.30 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 9.83 टक्के वाढीसह 12.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इंटेग्रा एसेंशिया या स्मॉलकॅप कंपनीमध्ये भारतातील सर्व मोठ्या विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LIC कंपनीने देखील गुंतवणूक केली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 6.25 रुपये या नीचांक पातळीवरून 94 टक्के वाढली आहे. 7 मार्च 2022 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 1.65 रुपये या आपल्या नीचांक पातळीच्या तुलनेत 610 टक्के वाढले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 39 पैशांवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 33 पट अधिक वाढवले आहेत.
LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे सुमारे 48.59 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर खरेदी केले होते. मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने 39 पैसे या आपल्या नीचांक किंमत पातळीपासून गुंतवणूकदारांना 3300 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Integra Essentia Share Price NSE Live 09 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं