IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 177% परतावा, संधी सोडू नका

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO मुख्यतः SME गटात ओपन होणार आहे. ( मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनी अंश )
या कंपनीच्या IPO बाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती. आता गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीचा IPO 21 जून ते 25 जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO साठी किंमत बँड 34 रुपये निश्चित केली आहे.
मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 4,000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदाराना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 136,000 रुपये जमा करावे लागतील. मेडिकामेन ऑरगॅनिक्स कंपनी 26 जून रोजी गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल. आणि 28 जून रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.
मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीने GYR Capital Advisors Pvt Ltd कंपनीला IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर Kfin Technologies कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 22.96 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीचा निव्वळ नफा 95.78 लाख रुपये होता.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये GMP वर ट्रेड करत आहेत. IPO स्टॉकची इश्यू किंमत आणि ग्रे मार्केटवरून असे समजते की, या कंपनीचे शेअर्स 94 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तब्बल 177 टक्के नफा मिळू शकतो. मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीचे मुख्य प्रवर्तक बाल किशन गुप्ता हे आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO GMP of Medicamen Organics Ltd 18 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं