IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर चालू आठवडा तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे. चालू आठवड्यात अनेक नवीन IPO शेअर बाजारात लाँच होणार आहेत.
आजपासून रामदेवबाबा सॉल्व्हेंट आणि ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला आहे. यासह तीर्थ गोपीकॉन आणि DGC केबल्स अँड वायर्स या दोन कंपन्याचे IPO शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाणार आहे.
सॉल्व्हेंट कंपनी IPO
रामदेवबाबा सॉल्व्हेंट कंपनीचा IPO 15 एप्रिल ते 18 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 50.2 कोटी रुपये रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. रामदेवबाबा सॉल्व्हेंट कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 59.13 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 80-85 रुपये निश्चित केली आहे.
या कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. उर्वरित 15 टक्के वाटा कंपनीने गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. रामदेवबाबा सॉल्व्हेंट ही कंपनी मुख्यतः फिजिकली रिफाइन्ड राइस ब्रेन ऑइलचे उत्पादन, वितरण, विपणन आणि विक्री करण्याचा उद्योग करत आहे.
ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस कंपनी IPO
ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस कंपनीचा IPO सोमवार दिनांक 15 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीच्या IPO चा आकार 16.5 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये 13.72 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 120 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 1,200 शेअर्स ठेवले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 50 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. ग्रिल स्प्लेंडर सर्व्हिसेस कंपनी 17 रिटेल आउटलेटच्या माध्यमातून किरकोळ व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO GMP today on 15 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं