IRB Infrastructure Developers Share Price | सकारात्मक बातमी येताच या कंपनीचे शेअर्स तेजीत आले, गुंतवणूक करून फायदा घेणार?

IRB Infrastructure Developers Share Price | शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे प्रमुख कारण एखादी सकारात्मक बातमी असते. असेच काहीसे ‘IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे. ‘IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे.
‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने ही माहिती सेबीला कळवली आने. या कंपनीला तेलंगणा राज्यात 7380 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली असण्याची बातमी येताच कंपनीचे शेअर्स तेजीत धावू लागले. कंपनीला हैदराबादमध्ये रिंग रोड बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 27.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
‘हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ ने विविध विकास प्रकल्पांसाठी निविदा अर्ज मगले होते. ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने या बोली प्रक्रियेत भाग घेतला आणि कंपनी यशस्वी ठरली. ‘IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीला 7380 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या वर्क ऑर्डरमध्ये कंपनी हैदराबाद आऊटर रिंग रोडचे बांधकाम करणार आहे. या रोडची लांबी 158 किलोमीटर असून कंपनी पुढील 30 वर्षात आपला खर्च टोलमधून वसूल करेल.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 28.25 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी वाढले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एका महिन्यापूर्वी IRB Infrastructure Developers Ltd कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांना 13.64 टक्के नफा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 34.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 17.89 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRB Infrastructure Developers Share Price today on 01 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं