IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA

IREDA Share Price | आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या (NSE: IREDA) दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. गेल्या वर्षीच या शेअरचा स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश झाला होता. तेव्हापासून या शेअरने २७०% परतावा दिला आहे. तर २०२४ या वर्षी आतापर्यंत ११०% परतावा दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
इरेडा शेअरची टार्गेट प्राईस
ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्म या शेअरसाठी २८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुंतवणूकदारांना जवळपास 27% परतावा मिळू शकतो. २०२४ या वर्षी आतापर्यंत ११०% परतावा दिला आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.69 टक्के घसरून 221.15 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.16 टक्के घसरून 218.55 रुपयांवर पोहोचला होता.
कंपनीबाबत ब्रोकरेजने काय म्हटले आहे
ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने दमदार कामगिरी केली आहे. इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या ‘AUM’ मध्ये वार्षिक आधारावर ३६% वाढ झाली आहे. NII मध्येही वाढ झाली आहे. इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीला भविष्यातील वाढीच्या दृष्टीने ताळेबंद मजबूत ठेवण्यासाठी ४५०० कोटी रुपये उभारण्यास मान्यता मिळाली आहे.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी वाढ
दुसऱ्या तिमाहीत इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा २८४.७३ कोटी रुपयांवरून ३८७.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचा महसूल १६३०.३८ कोटी रुपये आहे. जो गेल्या वर्षी याच कालावधीत ११७६.९६ कोटी रुपये होता. इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे व्याज उत्पन्न ३६० कोटी रुपयांवरून ५४७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IREDA Share Price 17 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं