IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 2 दिवसात तब्बल 130 टक्के परतावा, हा स्वस्त शेअर खरेदी करून फायदा घ्यावा?

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 15 टक्के वाढीसह 68.91 रुपये किमतीवर पोहचला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 115 टक्के वाढले आहेत.
आयआरईडीए कंपनीने शेअरधारकांना 32 रुपये किमतीवर शेअर वाटप केले होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 68.91 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.31 टक्के घसरणीवसह 65.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयआरईडीए कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या दोन दिवसात दुप्पट केले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये निश्चित केली होती. आणि गुंतवणूकदारांना 32 रुपये किमतीवर शेअर्स वाटप करण्यात आले आहेत. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स 56 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 68.9 रुपये किमतीवर पोहचला होता.
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या IPO ला एकूण 38.80 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. या कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 104.57 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 आणि 13 लॉट खरेदी करू शकत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IREDA Share Price NSE 01 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं