IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २३०८५ वर बंद झाला होता. मात्र मंगळवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स ३८० अंकांनी वधारून ७६७१० च्या पातळीवर पोहोचला होता. दरम्यान, ब्रोकरेजने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ विकास सेठी यांनी आपल्या पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून मिडकॅप श्रेणीतून इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरची निवड केली आहे. ब्रोकरेजच्या मते इरेडा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो.
सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ रेटिंग दिली
सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने इरेडा कंपनी शेअरबाबत ‘BUY’ रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
इरेडा शेअर टार्गेट प्राईस
मंगळवारी इरेडा शेअर 4.01 टक्क्यांच्या तेजीसह 207.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. इरेडा शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर 310 रुपये असून तो उच्चांकी पातळीवरून ३५ टक्क्यांनी घसरला आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल तितकासा चांगला लागला नाही. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरसाठी पुढील ९-१२ महिन्यांसाठी २७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ही टार्गेट प्राईस ३८ टक्क्यांनी अधिक आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IREDA Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं