IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC

IRFC Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी कंपनी शेअर 2.79 टक्क्यांनी घसरून 136.75 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 116.65 रुपये होता. सोमवारच्या घसरणीनंतर आयआरएफसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,78,886 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले संकेत
लक्ष्मीश्री सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक अंशुल जैन यांनी आयआरएफसी शेअरबाबत सांगितले की, ‘आयआरएफसी शेअरमध्ये खरेदीचा क्लायमॅक्स झाला आहे, त्यामुळे पुढे हा शेअर ११६ रुपयांपर्यंत घसरू शकतो. मात्र, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व तेजीमध्ये हा शेअर पुन्हा १५० ते १५५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना इच्छा असल्यास त्यांना या पातळीवर आयआरएफसी शेअरमधून बाहेर पडता येईल.
दुसरे स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी शाह पटेल आयआरएफसी शेअरबाबत म्हणाले की, ‘आयआरएफसीचे शेअर्स मजबूत असून, शेअरला १२८ ते १३० रुपयांवर सपोर्ट आहे. गुंतवणूकदारांना १६० रुपयांच्या वर हा शेअर ऍव्हरेज करावा. आयआरएफसी शेअरने हा टप्पा ओलांडल्यानंतर शेअरमध्ये जोरदार खरेदी होण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले. ध्वनी शाह पटेल यांनी हा शेअर 200 रुपये टार्गेट प्राईस[पर्यंत पुन्हा वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ वर्षात आयआरएफसी शेअर 19.96 टक्क्यांनी घसरला आहे. मागील पाच वर्षात आयआरएफसी शेअरने 451.41 टक्के परतावा दिला आहे. मात्र YTD आधारवर आयआरएफसी शेअर 9.05 टक्क्यांनी घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price Monday 27 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं