ITI Share Price | आयटीआय शेअर धुमाकूळ घालतोय, मागील एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला, काल एका दिवसात 10 टक्के

ITI Share Price | आयटीआय लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 190.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ITI लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 65 टक्के वाढवले आहेत.
या सरकारी कंपनीने नुकताच SMAASH या ब्रँड नावाने लॅपटॉप आणि मायक्रो पर्सनल कॉम्प्युटर लाँच केले आहेत. आता त्यांना ग्राहकाकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. म्हणून ITI कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी आयटीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 190.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
आयटीआय लिमिटेड कंपनीचे लॅपटॉप आणि मायक्रो पीसी जगभरातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडला जोरदार स्पर्धा देत आहेत. आयटीआय कंपनीने बनवलेले लॅपटॉप आणि मायक्रो पीसी गुणवत्ता आणि कामगिरीच्या आधारावर आंतरराष्ट्रीय ब्रँड्सपेक्षा चांगले आहेत. या सरकारी कंपनीने इंटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या मदतीने लॅपटॉप आणि PC बनवले आहे. आयटीआय लिमिटेड कंपनीच्या मते त्याचा मायक्रो पीसी हा एक इको फ्रेंडली उत्पादन असून तो कमी उर्जा वापरतो.
या कंपनीच्या मायक्रो पीसीमध्ये पंख्यासारखा हलणारा कोणताही पार्ट बसवण्यात आलेला नाही. म्हणून त्या चा लाईफ स्पान हा खूप अधिक आहे. नुकताच आयटीआय लिमिटेड कंपनीने जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये SMAASH ब्रँड नावाने लॅपटॉप आणि मायक्रो पीसीचे अनावरण केले आहे.
आयटीआय लिमिटेड कंपनीने Acer, HP, Dell आणि Lenovo यासारख्या बहुराष्ट्रीय ब्रँडसोबत स्पर्धा करून विविध निविदा मिळवल्या आहेत. ITI लिमिटेड कंपनीने इंटेल कॉर्पोरेशनसोबत देखील डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग संबंधित करार केला आहे. या कंपनीने आपले PC 13, 15 आणि 17 प्रोसेसरसह लाँच केले आहेत. ITI लिमिटेड कंपनी आपल्या विविध ग्राहकांच्या साइटवर 12000 पेक्षा अधिक PC स्थापन केले आहेत. केरळ राज्यातील शाळांमध्ये आयटीआय लिमिटेड कंपनीने 9000 लॅपटॉपचे वाटप केले आहे.
नुकताच केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनकडून देखील कंपनीने 2 निविदा मिळवल्या आहेत. या ऑर्डरनुसार आयटीआय लिमिटेड कंपनीला केरळ राज्यातील सरकारी शाळांना आणखी 9000 लॅपटॉप पुरवठा करायचे आहे.
आयटीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 65 टक्के मजबूत झाले होते. तर 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 115.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 22 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 190.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ITI Share Price today on 23 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं