Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price | जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आणि झोमॅटो लिमिटेड कंपनी निफ्टी 50 निर्देशांकात सामील होण्याची शक्यता अधिक (NSE: JIOFIN) वाढली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आणि झोमॅटो लिमिटेड या कंपन्या अलीकडेच एनएसई F&O सेगमेंटमध्ये सामील झाल्या आहेत, जी निफ्टी 50 मध्ये स्थान मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म रिपोर्ट
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या निफ्टी निर्देशांकाच्या अपडेट दरम्यान जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि झोमॅटो लिमिटेड या कंपन्यांचा निफ्टी ५० मध्ये समावेश होऊ शकतो. जेएम फायनान्शिअलने पुढे म्हटले आहे की, ‘F&O सेगमेंटमध्ये सामील झाल्यानंतर जिओ फायनान्शियल आणि झोमॅटो कंपन्यांची निफ्टी 50 मध्ये सामील होण्याची शक्यता आणखी मजबूत झाली आहे.
गुंतवणुकीची क्षमता
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म रिपोर्टनुसार, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीमध्ये जवळपास 3,140 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. झोमॅटो लिमिटेड निफ्टी ५० मध्ये सामील झाल्यानंतर म्युच्युअल फंडातून सुमारे ५,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि झोमॅटो लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये जवळपास ८,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, जे कंपन्यांच्या गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत आहेत.
हे शेअर्स निफ्टीतून बाहेर पडू शकतात
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मनुसार, ‘बीपीसीएल आणि आयशर मोटर्सचे शेअर्स निफ्टी ५० निर्देशांकातून बाहेर पडू शकतात. बीपीसीएल आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समधून अनुक्रमे १,८८२ कोटी आणि २,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते.
शेअरने किती परतावा दिला
मागील १ महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 4.21% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 9.98% घसरला आहे. मागील १ वर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 40.82% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 36.26% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Jio Finance Share Price 16 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं