Jio Financial Services Share Price | जेफरीजकडून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रति शेअर 134 रुपये ते 224 रुपये किंमत श्रेणी निश्चित

Jio Financial Services Share Price | ‘Jefferies’ या दिग्गज गुंतवणूक संस्थेने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ची उपकंपनी ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ च्या शेअरसाठी प्रति शेअर 134 रुपये ते 224 रुपये किंमत श्रेणी निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनी सप्टेंबर 2023 आपला IPO बाजारात लाँच करेल आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या प्रत्येक शेअर्सवर विद्यमान शेअरधारकांना ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मिळतील.
ब्रोकरेज फर्मने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर 3,100 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ च्या 14,000 कोटी रुपये नेट वर्थच्या आधारे या कंपनीचे एकूण बाजार मूल्य 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपये पर्यंत असू शकते. जेफरीज फर्मच्या मते ‘जिओ फायनान्शियल’ कंपनीची एकूण संपत्ती 28,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. याशिवाय, ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनीने RIL कंपनीचे 6.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे, ज्याचे एकूण मूल्य 96,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते.
नोमुरा फर्मचे मत :
नोमुरा फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ” या दोन्ही कंपन्याच्या डिमर्जरमुळे विविध गुंतवणूकदार, धोरणात्मक भागीदार, वित्त व्यवसायात विशिष्ट स्वारस्य असलेले कर्जदार या कंपन्यांकडे आकर्षित होतील. ‘जिओ फायनान्शिअल’ ही स्वतंत्र संस्था म्हणून उद्योग मानकांचे पालन करेल”. नोमुरा फर्मने RIL कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकसाठी 2,850 रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. YTD आधारावर RIL कंपनीचे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. JioFS कंपनीची लिस्टिंग RIL कंपनीच्या घसरत्या स्टॉक किमतीसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड असेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jio Financial Services share Price check details on 05 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं