Joint Home Loan Benefits | पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे, कमी व्याजदरासह होतील हे फायदे

Joint Home Loan Benefits | स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु मालमत्तेच्या किमती पाहता घर खरेदीकरण्यासाठी पुरेशी बचत करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश लोक घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा आधार घेतात. होम लोनच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी हवी ती रक्कम मिळते आणि ती तुम्ही नंतर सोप्या हप्त्यांमध्ये फेडू शकता. गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला करसवलत मिळते.
जॉइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे
पण तुम्हाला माहित आहे का की जॉइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर जर ती महिला अर्जदार असेल तर तिला वेगवेगळे अनेक फायदे मिळतात. तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा बहिणीला गृहकर्जासाठी संयुक्त अर्जदार बनवू शकता. संयुक्त गृहकर्जाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
पत्नीसोबत जॉइंट होम लोनसाठी अर्ज
जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट होम लोनसाठी अर्ज केला तर सर्वात मोठा फायदा म्हणजे दोघांचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारे तुम्हाला इच्छित रक्कम चांगल्या व्याजदराने कर्जाच्या स्वरूपात मिळते. तर याचा एक फायदा म्हणजे गृहकर्जाच्या बाबतीत दोघेही कलम 80 सी अंतर्गत इन्कम टॅक्स बेनिफिटचा दावा करू शकतात. दोन्ही अर्जदारांना व्याजावर २ लाख रुपये आणि मुद्दलावर ५ लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो.
अर्जदार महिलांसाठी व्याजदर कमी असतो
जॉइंट होम लोनअर्जमध्ये महिला अर्जदार ठेवल्यास तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळतात. महिला गृहकर्ज अर्जदारांना बँका कमी व्याजदराने कर्ज देतात. हा दर साधारण गृहकर्जाच्या दरापेक्षा सुमारे ०.०५ टक्के म्हणजेच ५ बेसिस पॉईंटने कमी आहे. अशा प्रकारे महिला अर्जदाराकडे गृहकर्जासाठी अर्ज करूनही तुम्ही कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकता.
ईएमआय भरण्यासाठी कोणावरही बोजा पडणार नाही
संयुक्त गृहकर्ज घेताना त्याची परतफेड करण्याचा भार कोणालाही सहन करावा लागणार नाही. कारण यामुळे दोन्ही अर्जदारांची बँक खाती लिंक होतील, जेणेकरून कोणताही ईएमआय चुकणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की ईएमआयच्या तारखेपूर्वी त्याचा हप्ता भरण्यासाठी दोन्ही पैकी कोणत्याही बँक खात्यात पुरेसे पैसे असायला हवेत. दोन्ही खात्यांमध्ये पैसे नसल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Joint Home Loan Benefits check details on 04 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं