JP Power Share Price | 18 रुपयाचा 'पॉवरफुल' जेपी पॉवर पेनी शेअर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट, वेळीच एंट्री घ्यावी का?

JP Power Share Price | जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे जेपी पॉवर कंपनी आज आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.69 टक्क्यांच्या वाढीसह 14.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 8.46 टक्क्यांच्या वाढीसह 18.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आज जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 18.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या जेपी ग्रुपच्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने सोमवारी माहिती दिली आहे की, मुद्दल आणि व्याजासह कंपनी 4,258 कोटी रुपये कर्जाची परतफेड करू शकली नाही. जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत कर्जाची 1,733 कोटी रुपये मूळ रक्कम आणि 2,525 कोटी रुपये व्याज जमा केले आहे.
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 65.19 टक्के वाढले आहेत. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 156.90 टक्के वाढले आहेत.
मागील सहा महिन्यात जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 5.80 रुपयेवरून वाढून 14.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 97.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 547.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 2.30 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | JP Power Share Price NSE BSE 10 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं