Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत

Kahan Packaging IPO | कहान पॅकेजिंग कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओला सर्वाधिक बोली प्राप्त झाली आहे. उपलब्ध डेटानुसार कहान पॅकेजिंग IPO स्टॉक तब्बल 730 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1042 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
पॅकेजिंग सेवा प्रदान करणाऱ्या कहान पॅकेजिंग कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर 90 टक्के प्रीमियम किंमत वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी कहान पॅकेजिंग कंपनीचे शेअर्स 99.50 टक्के वाढीसह 159.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कहान पॅकेजिंग कंपनीचे शेअर्स 152 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीचा आयपीओ स्टॉक 80 रुपये किमतीवर जारी करण्यात आला होता. कहान पॅकेजिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये 7.20 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्याची योजना आखली होती. कहान पॅकेजिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 3.408 लाख इक्विटी शेअर्सचा कोटा राखीव ठेवला होता.
कहान पॅकेजिंग कंपनी भारतातील एक आघाडीची पॉलिमर फॅब्रिक आणि बॅग बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 80 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. या कंपनीच्या IPO चा आकार 5.76 कोटी रुपये होता. कहान पॅकेजिंग कंपनी आपल्या IPO मधून मिळणारी रक्कम खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशाची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kahan Packaging IPO for investment on 16 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं