Stock In Focus | वेगात पैसा, 2 दिवसात शेअरने 30 टक्के परतावा दिला, टार्गेट प्राईस जाहीर, स्टॉक नेम नोट करा

Stock in Focus | कर्नाटक बँकेचे शेअर्स गेल्या 2 दिवसांपासून रॉकेट सारखे वर जात आहेत. फक्त 2 दिवसात या बँकेच्या शेअर्समध्ये 30 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक बँकेचे शेअर्स BSE निर्देशांकावर 93.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 नोव्हेंबर 2022 रोजी या बँकेच्या शेअर्सनी 123.05 रुपयांची किंमत पातळी स्पर्श केली होती. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 123.05 रुपये आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या नफ्यात जबरदस्त विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. सकारात्मक तिमाही निकालनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक तज्ञांचे म्हणणे आहे की, या खाजगी बँकेचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 150 रुपयांवर पोहोचू शकतात.
शेअर्समधील वाढ :
मागील 6 महिन्यांत कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये 95 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. खासगी क्षेत्रातील या कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किंमत मागील सहा महिन्यांत 95 टक्क्यांनी वाढली आहे. 4 मे 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर कर्नाटक बँकेचे शेअर्स 62.40 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 3 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक बँकेचे शेअर्सची किंमत 123 रुपयांपर्यंत वाढली होती. मागील एका महिन्यात कर्नाटक बँकेच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 45 टक्केचा परतावा कमावून दिला आहे. कर्नाटक बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 55.25 रुपये होती. कर्नाटक बँकेचे बाजार भांडवल 3766 कोटी रुपये आहे.
सर्वाधिक तिमाही नफा :
कर्नाटक बँकेने 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 411.5 कोटी रुपये प्रॉफिट मिळवला आहे. या खासगी बँकेने कमावलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही प्रॉफिट असल्याचे बोलले जात आहे. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत सध्याच्या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या नफ्यात 228 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत कर्नाटक बँकेने फक्त 125.45 कोटी रुपयांचा प्रॉफिट मिळवला होता. कर्नाटक बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 525.52 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे, जो एखाद्या खाजगी बँकेने कमावलेला आतापर्यंतचा सर्वाधिक सहामाही प्रॉफिट असल्याचे म्हंटले जात आहे.
भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने कर्नाटक बँकेच्या शेअर्सची लक्ष किंमत 156 रुपये निश्चित केली असून हे स्टॉक बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसला असा अंदाज आहे की, पुढील काळात कर्नाटक बँकेचे शारदा 156 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस आनंद राठी फर्मनेही कर्नाटक बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन रेटिंग 140 रुपयांच्या लक्ष्य किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Karnataka Bank Stock In Focus of Stock market expert for buying on short term basis on 04 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं