L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर तेजीत वाढतोय, 'या' बातमीने स्टॉक मजबूत परतावा देणार?

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4.5 लाख कोटी रुपये आहे. लार्सन अँड टुब्रो या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीला मध्य पूर्वेकडील देशाकडून 30,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. लार्सन अँड टुब्रो कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मध्यपूर्वेतील एका प्रतिष्ठित ग्राहक कंपनीने 15,000 कोटी रुपये मुक्यची ऑर्डर दिली आहे.
या ऑर्डर अंतर्गत प्लॅटफॉर्म आणि ग्राउंड फील्ड वर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला नवीन ऑर्डर अंतर्गत अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम संबंधित कामे देण्यात आली आहे. आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 3,081.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या हायड्रोकार्बन व्यवसाय युनिटला मध्य पूर्वेतील गॅस कॉम्प्रेशन प्लांटची उभारणी करण्यासाठी 15,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये इनलेट सेपरेशन सुविधेसह अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामाचे काम देण्यात आले आहे.
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 175 टक्के परतावा कमावून दिला आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही 51024 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 20 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 8173 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला आहे. तर कंपनीने वार्षिक आधारावर 37 टक्क्यांच्या वाढीसह 3855 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.
या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 37.20 टक्के लाभांश देखील वाटप केला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.24 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3115 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2007 रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | L&T Share Price NSE 22 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं