L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.75 टक्क्यांच्या वाढीसह 3,782.75 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या काळात शेअर्सची किंमत 3500 रुपयेवरून वाढून 3,782.75 रुपये किमतीवर पोहोचली आहे. काल गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 1.58 टक्के वाढीसह 3,764.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
शेअर बाजारातील तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. दैनिक चार्टवर लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहेत. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
या कंपनीच्या शेअर्सने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दैनिक चार्ट पॅटर्नवर हायर-हायर आणि लोअर-हायर पॅटर्न तयार करून नवीन ऑल टाइम हाय किंमत स्पर्श केली होती. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 23 अब्ज डॉलर्स आहेत. ही कंपनी मुख्यतः ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. नुकताच लार्सन अँड टुब्रो कंपनीची उपकंपनी L&T जिओस्ट्रक्चर्सला अनेक मोठ्या ऑर्डरची प्राप्ती झाली आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीची उपकंपनी असलेल्या L&T जिओस्ट्रक्चर्स कंपनीने माहिती दिली की, त्यांना हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडून आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे स्लिपवे-4 चा विस्तार करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत L&T जिओस्ट्रक्चर्स कंपनीला 300 मेट्रिक टन गोलियाथ क्रेन उभारणे, क्रेन ट्रॅक बांधणे आणि गॅस युटिलिटीज, अग्निशमन पुरवठा आणि यंत्रणा यासारख्या कामांची पूर्तता करायची आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असून हा स्टॉक गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतो. शेअर बाजारातील 28 तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणुकदारांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 3500 रुपये किंमत पातळीवर खरेदी करावे, आणि 3900 रुपये या टार्गेट प्राइससाठी होल्ड करावे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | L&T Share Price NSE Live 29 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं