L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर्स मजबूत तेजीत, RVNL कंपनीकडून मोठी ऑर्डर, शेअर्सवर किती फायदा होणार?

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन या भारतातील दिग्गज बांधकाम कंपनीला विविध प्रतिष्ठित ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाले आहेत. त्यामुळे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या स्टॉकच्या हालचालींवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला कोलकाता शहरात भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच सरकारी मालकीच्या RVNL कंपनीकडून कंत्राट देण्यात आले आहे.
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या कंपनीला मोमीनपूर ते एस्प्लानेड या 5 किमी अंतर असलेल्या रेल्वे मार्गावर भूमिगत मेट्रो स्टेशन उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. यामध्ये कंपनीला टनेल बोरिंग मशीनने बोगदे बनवणे आणि कट अँड कव्हर पद्धतीने काम करावे लागणार आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के वाढीसह 2,613.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लार्सन अँड टुब्रो कंपनीला मध्यपूर्वे आशियातील एका देशात नवीन काम मिळाले आहे. यात लार्सन अँड टुब्रो कंपनीला मध्यपूर्वेमध्ये पुनर्वसित संरचना उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या या कार्यामध्ये व्यवहार्यता अभ्यास, संकल्पना डिझाइन, डिटेल डिझाइन, बांधकाम आणि स्थापना या सर्व कामाची जबाबदारी असेल. नुकताच लार्सन अँड टुब्रो कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीची विक्री 33 टक्क्यांनी वाढून 47882 कोटी रुपयेवर पोहचली आहे.
जून 2023 तिमाहीत लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन कंपनीने 19 टक्के वाढीसह 3096 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4.13 कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के घसरणीसह 2621 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस लाभांश देखील वाटप करते. कंपनीचा लाभांश वार्षिक दर 37.2 टक्के आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2629 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.7 लाख कोटी रुपये आहे. 20 जून 2022 रोजी लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 1471 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नीचांक किमतीच्या तुलनेत हा स्टॉक तब्बल 80 टक्के वाढला आहे.
20 जून 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2355 रुपये किंमत पातळीवर पोहोचले होते. या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी आता 15 टक्के नफा कमावला आहे. बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 2185 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी आता 20 टक्के नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Larson & Toubro Share Price today on 04 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं