एकदाच पैसे भरा आणि १४ लाख मिळवा | LIC ची जबरदस्त योजना - नक्की वाचा

मुंबई, १३ ऑगस्ट | आज आम्ही तुम्हाला एलआयसी (LIC) च्या अशा एक पॉलिसीबाबत सांगणार होतोत जे 10-25 वर्षांमध्ये मॅच्युरिटी होते आणि तुलनात्मक आधारावर एफडीपेक्षा चांगला परतावा देते. बँकेतील मुदत ठेवीशी तुलना केल्यास एलआयसीची वन टाइम प्रिमिअम योजना खूप सरस ठरते. एकरकमी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एलआयसीची योजना खूप फायदेशीर ठरते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही योजना तयार केली आहे. या पॉलिसीचा टेबल नंबर ९१७ आहे. पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास किमान प्रवेश वय ९० दिवस आणि कमाल प्रवेश वय ६५ वर्षे आहे. त्याचे कमाल मॅच्युरिटी वय ७५ वर्षे आहे. योजनेची मुदत १० ते २५ वर्षांची असते.
विशेषत: जे एकरकमी गुंतवणूक करतात, त्यांना लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आलीय. प्रीमियम भरण्याची मुदत सिंगल प्रीमियम आहे. या पॉलिसीसह दोन प्रकारचे रायडर देखील उपलब्ध आहेत. पहिला रायडर म्हणजे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर असतो. तर दुसरा रायडर न्यू टर्म इश्युरन्स रायडर आहे. कर लाभांबद्दल बोलायडे झाल्यास प्रीमियम भरल्यावर, तुम्हाला 80C अंतर्गत करकपातीचा लाभ मिळतो. एलआयसीच्या या योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कम ५० हजार इतकी आहे. तर कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही ५० हजारांच्या वर ५ हजारच्या पटीत कितीही रक्कम यात एकरकमी पद्धतीनं गुंतवणूक करू शकता.
या योजनेत मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट असे दोन्ही पर्याय उपलब्ध होतात. म्हणजेच योजनेची मुदत संपल्यानंतर लाभार्थ्याला मॅच्युरिटीचा पूर्ण लाभ मिळतो. तर मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला योजनेचा लाभ मिळतो. दुसऱ्या पर्यायाअंतर्गत विमाधारक 5, 10 किंवा 15 वर्षांसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर EMI म्हणून मॅच्युरिटी रक्कम घेऊ शकतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: LIC single premium policy benefits news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं