Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल

Maiden Forgings IPO | सध्या भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. मटर सध्या तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्यासाठी IPO मध्ये गुंतवणूक करण्याची एक सुवर्ण संधी येत आहे. या आठवड्यात ‘मेडेन फोर्जिंग’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 22 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. आणि हा IPO 24 मार्च पर्यंत खुला राहील. (Maiden Forgings Limited)
कंपनीचे स्पष्टीकरण :
‘मेडेन फोर्जिंग्स’ ही कंपनी मुख्यतः स्टील रॉड्स आणि वायर उत्पादन करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हंटले आहे की, प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे म्हणजेच IPO च्या माध्यमांतून कंपनी 24 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘मेडेन फोर्जिंग्स’ कंपनीचा IPO 22 ते 24 मार्च 2023 या कालावधीमध्ये गुंतवणुकीसाठी खुला असेल.
IPO चे तपशील :
‘मेडेन फोर्जिंग्स’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून एकूण 37,84,000 इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. त्यापैकी अंदाजे 17,97,000 शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर 5,39,100 शेअर्स गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आणि उर्वरित शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Maiden Forgings IPO will open for subscription check details on 20 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं