Monthly Pension Scheme | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या मुलांनाही मिळणार पेन्शन, सरकारी योजनेचा लाभ घ्या - Marathi News

Monthly Pension Scheme | लोकसभेमध्ये केंद्र सरकारने 2024 चा पहिला बजेट सादर केला. वित्तीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस वात्सल्या) याबाबत माहिती दिली होती. निर्मला सितारमण यांच्या माहितीप्रमाणे एनपीएस वात्सल्या ही योजना मुलांचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एनपीएसमध्ये बदलली जाणार. आई वडील आपल्या मुलांसाठी ही पेन्शन योजना बनवू शकतात. मुलांचे शिक्षण त्यांच्या भविष्यामध्ये लागणारा खर्च या पैशांमधून पूर्ण करता येऊ शकतो.
एनपीएस वात्सल्या योजना म्हणजे काय?
एनपीएस योजना केंद्र सरकारद्वारा सुरू केली गेलेली योजना आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर पैसे मिळणं सुरू होतं. अशातच एनपीएस वात्सल्या ही योजना नाबालिकांसाठीची स्कीम आहे. ज्यामध्ये अपत्याचे आई वडील कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. या योजनेअंतर्गत जेव्हा तुमचा मुलगा अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा ही स्कीम सामान्य एमपीएसमध्ये बदलली जाईल. त्याचबरोबर पेन्शन फंड म्हणजे तुमची पेन्शन अमाऊंट विकास प्राधिकरण आणि नियामक एनपीएसला प्रशासित आणि कंट्रोल करण्याचे काम करते.
दोन्ही बाजूंनी येतील पैसे :
2009 आधी नॅशनल इन्कम स्कीम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केली गेली होती. परंतु आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देखील या स्कीमचा लाभ घेता येतो. ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी इन्व्हेस्ट केलं जाऊ शकतं. ज्यामध्ये टीअर-1 आणि टीअर-2 पर्याय पाहायला मिळतात.
एनपीएस टीअर 1 आणि टीअर 2 म्हणजेच रिटायरमेंट अकाउंट आणि वॉलेंटियर अकाउंट होय. यामध्ये अकाउंट उघडताना टिअर 1 मध्ये पाचशे रुपये तर टिअर 2 मध्ये हजार रुपये भरून गुंतवणूक केली जाऊ शकते. तुम्ही या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचबरोबर एनपीएसमध्ये जमा असलेल्या पैशांचा 60% हिस्सा रिटायरमेंटनंतर एकदम काढला जाऊ शकतो आणि 40% हिस्सा पेन्शन स्कीममध्ये जातो. एवढेच नाही तर, एनपीएसमध्ये इन्व्हेस्ट करण्याची कोणतीही सीमा दिली गेली नाहीये.
अशा पद्धतीने करा एनपीएस अकाउंट ओपन :
अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी नॅशनल पेन्शन सिस्टमच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनच ऑप्शन येईल ते क्लिक करून रजिस्टर विथ आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आलेला ओटीपी जनरेट करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची विचारली गेलेली माहिती भरून टाकायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये स्कॅन केलेलं हस्ताक्षर अपलोड करा. त्यानंतर पेमेंट करून एमपीएस खातं ओपन करा.
Latest Marathi News | Monthly Pension Scheme 10 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं