Multibagger Dividend | या शेअरच्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर 300 टक्के डिव्हीडंड, शेअर खरेदीसाठी झुंबड

Multibagger Dividend| कोविडची लस बनवणारी कंपनी Pfizer ने आपल्या पात्र भागधारकांना 300 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांशाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
शेअर बाजारात नेहमी लाभांश वाटपाची स्पर्धा लागलेली असते. आता या यादीत आणखी एक कंपनी सामील झाली आहे. ही कंपनी आहे Pfizer. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र भागधारकांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
सेबिला दिलेल्या माहितीत कंपनीने माहिती दिली आहे की, “ 6 सप्टेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 30 रुपये लाभांश देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. म्हणजेच पात्र भागधारकांना कंपनीकडून तब्बल 300 टक्के लाभांश वितरीत केला जाईल. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2022 मध्ये भागधारकांना 300 टक्के लाभांश वितरीत केला जाईल. फायझर कंपनीने 20 सप्टेंबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट असेल अशी माहिती सेबिला दिली आहे.
बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी फायझरने 1996 साली भारतीय शेअर बाजारात प्रवेश केला होता. आजारावरील लस, रुग्णालय, औषधांचा व्यापार करणाऱ्या ह्या फायझर कंपनी शेअर्समध्ये चालू वर्षात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. कंपनीचे शेअर्स NSE वर 15 टक्क्यांहून अधिक घसरले होते, आणि शेअर्सची किंमत 4311 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. त्याचवेळी, शेअर्सच्या मागील एक वर्षाच्या कामगिरीबद्दल माहिती घेतल्यास, कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 29 टक्क्यांनी खाली आली आहे. फायझरची कोविड लस अमेरिकन फार्मा मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Dividend declared by Pfizer company on 7 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं