Multibagger Dividend | बाब्बो! या शेअरवर फक्त 400 टक्के डिव्हीडंड मिळणार, तज्ञ म्हणाले स्टॉक तत्काळ खरेदी करा, डिटेल्स पाहा

Multibagger Dividend | प्रसिद्ध FMCG कंपनी इमामी लिमिटेडने नुकताच आपले सप्टेंबर तिमाहीचे प्रॉफिटेबल निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच इमामी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. इमामी लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 20,511 कोटी रुपये असून ही एक लार्ज-कॅप कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे काही प्रसिद्ध उत्पादने जसे बोरोप्लस, नवरत्न, फेअर अँड हँडसम, झंडू बाम, मेन्थो प्लस बाम, फास्ट रिलीफ आणि केश किंग यांसारखे त्याचे ब्रँडची बाजारात खूप मागणी आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण :
इमामी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कलवलेल्या माहितीत म्हंटले आहे की,” कंपनीच्या संचालक मंडळाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी एक बैठक आयोजित केली होती, ज्यात संचालकांनी आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 21 नोव्हेंबर 2022 असेल, असे कंपनीने आपल्या फायलिंग मध्ये म्हंटले आहे.
कंपनीचे तिमाही निकाल :
इमामी कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर केले आहेत. कंपनीने सांगितले आहे की कंपनीची मागील तिमाहीत निव्वळ विक्री 807.36 कोटी रुपये होती. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचे सेल्स 777.1 कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर कंपनीने 3.9 टक्के वाढ नोंदवली आहे.
इमामीचा महसूल :
गेल्या वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत इमामी कंपनीने 787.12 कोटी रुपये महसूल कामवला होता, जो या तिमाहीत वाढून 813.75 कोटी रुपयेवर गेला आहे. इमामी कंपनीने सप्टेंबर 2022 या तिमाहीत 184.18 कोटी रुपये निव्वळ नफा संकलित केला आहे. ते वर्ष-दर-वर्ष या आधारावर -0.6 टक्के कमी आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 185.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
तज्ञांचे मत :
ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओसवाल यांनी इमामी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओसवाल यांनी “बाय रेटिंग” कायम ठेवली आहे. पुढील काळात या शेअरची किंमत 550 रुपये पर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इमामी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 465.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2022 या चालू वर्षात हा स्टॉक 10.83 टक्के कमजोर झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Dividend has announced by Emami Limited company to its existing shareholders on 18 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं