Multibagger Dividend | मल्टीबॅगर स्टॉकचा 250 टक्क्यांचा मल्टीबॅगर लाभांश सुद्धा, असे डिव्हीडंड देणारे स्टॉक बिनधास्त खरेदी करा

Multibagger Dividend | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण तर आहेच, सोबत जगात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा काळात सुद्धा काही कंपन्यां आहेत, जे आपल्या शेअर धारकांना भरघोस लाभांश किंवा बोनस शेअर्स वाटप करत आहेत. या घोषणांमुळे गुंतवणूकदारांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. मिड-कॅप कंपनी व्हीआयपी इंडस्ट्रीजने आपल्या शेअर धारकांना अंतरिम लाभांश जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. या कंपनीने लाभांश ची रेकॉर्ड तारीख नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे. चला तर मग जाणून घेऊ अधिक या कंपनीच्या लाभांशाबद्दल
रेकॉर्ड तारीख आणि लाभांश प्रमाण :
VIP कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, “ कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांनी आपल्या शेअर धारकांना अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने प्रति शेअर 2.50 रुपये म्हणजेच 250 टक्के लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. संचालक मंडळातील सदस्यांनी 4 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी 17 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर आपल्या पात्र गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करेल.
कंपनीची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.45 टक्क्यांच्या कमजोरीसह 703.50 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील पाच वर्षात व्हीआयपी इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 151.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षभराचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीच्या शेअरची किंमत 28.03 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये या कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त प्रदर्शन केले आहे. या कालावधीत व्हीआयपी उद्योगांचा हिस्सा 28.03 टक्क्यांनी वाढला आहे. VIP कंपनीच्या एकूण मालकीत प्रमोटर्सचा वाटा 51.33 टक्के आहे. संस्थात्मक परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 8.95 टक्के आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीतील वाटा 20.59 टक्के असून किरकोळ गुंतवणूकदारांकडे 19.14 टक्के वाटा आहे. VIP कंपनीचे बाजार भांडवल 9980.78 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Dividend has announced by VIP Industries company for existing shareholders on 02 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं