Multibagger Penny Stocks | 5 रुपये पेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत होते हे पेनी स्टॉक, आता मालामाल झाले गुंतवणूकदार

Multibagger Penny Stocks | शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त परतावा देणारे स्टॉक जास्त आकर्षक वाटतात आणि ते हमखास त्यात गुंतवणूक करतात. लार्जकॅप, स्मॉलकॅप स्टॉक, पेनी स्टॉक हे खास आकर्षण असतात आणि कधी कधी तर हे स्टॉक छप्पर फाड परतावा देतात. आज आपण अश्याच काही पेनी स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत. आम्ही तुम्हाला शेअर बाजारातील स्वस्त अशी 10 रुपयांच्या खाली ट्रेड करणाऱ्या 5 पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत. कैसर कॉर्पोरेशन हा पेनी स्टॉक देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे, ज्याने एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2900% परतावा मिळवून दिला आहे.
टॉप मल्टीबॅगर पेनी स्टॉक 2022 :
हर्षद मेहता शेअर बाजार घोटाळा वर नुकताच एक चित्रपट येऊन गेला. त्यात एक सुंदर डायलॉग आहे, “रिस्क है तो इश्क है”. ह्याचा अर्थ असा की जेवढी जास्त जोखीम घ्याल तेव्हढा जास्त नफा होईल. पेनी स्टॉक्सवर हा डायलॉग एकदम उत्तम प्रकारे बसतो. पेनी स्टॉक कंपन्यांच्या स्टॉकची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते, परंतु परताव्याच्या बाबतीत ते पेनी स्टॉक एकतर गुंतवणूकदारांना करोडपती बनवतील किंवा त्यांना रस्त्यावर आणतील. आज आम्ही तुम्हाला 10 रुपयांच्या खाली ट्रेड करण्याऱ्या 5 जबरदस्त पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदाराना करोडपती केले आहे. कैसर कॉर्पोरेशन हा देखील अशाच स्टॉकपैकी एक आहे, ज्याने एक वर्षात आतापर्यंत 2900% पर्यंत परतावा दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही 7 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते 30 लाख रुपये झाले असते.
2022 चे टॉप मल्टीबॅगर पेनी स्टॉक
कैसर कॉर्पोरेशन :
कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर मध्ये आतापर्यंत 2900% वाढ झाली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी कैसर कॉर्पचा शेअर 2.92 रुपये वर ट्रेड करत होता, सध्या ह्या शेअर किंमत 87.95 रुपये झाली आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 130.55 आहे आणि नीचांक 0.38 पैसे आहे.
गॅलप एंटरप्रायझेस :
गॅलप एंटरप्रायझेसच्या शेअरचे मूल्य मागील एका वर्षात 4.78 रुपयांवरून 73.70 रुपयांपर्यंत वाढले आहे. या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरच्या किंमतमध्ये 1441% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 112.65 आहे आणि नीचांक 4.35 रुपये आहे.
हेमांग रिसोर्सेस लिमिटेड :
हेमांग रिसोर्सेसचा एक शेअर ३ जानेवारी २०२२ रोजी ३.१२ रुपयेवर ट्रेड करत होता. आज हा शेअर ३७ रुपयेला ट्रेड करत आहे. या वर्षात आतापर्यंत ह्या सरॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1085% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 2.90 रुपये वर आहे आणि उच्चांक किंमत 76.05 रुपये आहे.
अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स :
अलायन्स इंटिग्रेटेड मेटॅलिकचा शेअर किंमत 3 जानेवारी 2022 रोजी 2.84 रुपयेवर ट्रेड करत होता. ज्याची किंमत आज 24.50 रुपये झाली आहे. एक वर्षात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 762% परतावा मिळवून दिला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 37.80 आहे आणि नीचांक 1.94 रुपये आहे.
मिड इंडिया इंडस्ट्रीज :
मिड इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेडचा स्टॉक 3.36 रुपये वर ट्रेड करत होता तर आता त्यात 3.39 रुपयांवरून 21.40 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 536% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. स्टॉक चा 52 आठवड्यांचा ट्रेड प्राईस उच्चांक पातळी 46.45 रुपये होता आणि नीचांक पातळी 2.89 रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Penny Stocks which has returned huge profits to investors as on 22 July 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं