Multibagger Stock | होय होय! हा शेअर लोकांचा पैसा गुणाकारात वाढवतोय, मग काय संधी घेत श्रीमंत होणार का?

Multibagger Stock | सोमनी सिरॅमिक्स एक फ्लोर आणि भिंतीसाठी प्रीमियम टाइलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र,चालू वर्षात या कंपनीचे शेअर्स सुमारे 43 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मजबूत किरकोळ वितरण, उत्पादनांच्या मिश्रणात सुधारणा आणि खेळत्या भांडवलाचे व्यवस्थित नियोजन यासारखे सकारात्मक पावले उचलल्याने कंपनीच्या व्यवसायात वाढ होत आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोमानी सिरॅमिक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये पुढील काळात 40 टक्क्यांची वाढ होऊ शकते. प्रसिद्ध भारतीय ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमानी सिरॅमिक्स कंपनीबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. वित्तीय वर्ष 2022-23 च्या जून तिमाहीत जाहीर निकालानुसार व्यापार विस्तारात 20 टक्के वाढ पाहायला मिळाली असून कंपनीची व्हॉल्यूम वाढ सकारात्मक राहील असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
शेअरची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने सोमानी सिरॅमिक्स कंपनीच्या शेअर्ससाठी 740 रुपयांची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे. शेअर्सची लक्ष किंमत ही सध्याच्या किंमतीपेक्षा 40 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 528.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते 23 जानेवारी 2009 रोजी सोमनी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स फक्त 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर्सची किंमत वाढून आता 528.70 रुपयांवर गेली आहे. तेरा वर्षांपूर्वी जानेवारी 2009 रोजी जेर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 63 पट अधिक वाढून 63 लाख रुपये झाले असते.
2022 या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत गॅसच्या किमती महाग झाल्यामुळे सोमनी सिरॅमिक्स कंपनीच्या व्हॉल्यूम आणि मार्जिनमध्ये किंचित घट पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 च्या सहामाहीत स्टॉक मध्ये कमालीची तेजी येऊ शकते. HDFC सिक्युरिटीज फर्मने या शेअरसाठी 740 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअरची वाटचाल :
17 नोव्हेंबर 2021 रोजी सोमानी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 952.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही किंमत या शेअरची संपूर्ण वर्षातील विक्रमी उच्चांक किंमत होती. यानंतर 23 जून 2022 नंतर शेअर्समध्ये विक्रीच दबाव वाढला आणि स्टॉक आता 46 टक्क्यांच्या घसरणीसह 512.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. या चढ-उतारांदरम्यान कंपनीचे शेअर्स सुमारे 3 टक्के वाढले आहे, आणि तज्ञांनी या स्टॉकमध्ये तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Samani Ceramics share price return on investment on 17 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं