Multibagger Stock | दारूत नव्हे तर या वाईन कंपनीच्या शेअरमध्ये पैसा ओता! लाखोत परतावा मिळतोय

Multibagger Stock | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेवटच्या काही तासात युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. शेअर तेजीसह 1040 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के नफा मिळवून दिला आहे.
शेअरची किंमत पाच दिवसात 957 रुपयेवरून वाढून 1040 रुपयेवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.46 टक्के वाढीसह 1,038.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 1 महिन्यात, युनायटेड स्पिरिट्स कंपनीच्या शेअरची किंमत 894 रुपयेवरून वाढून 1040 रुपयेवर पोहोचली आहे. तर या काळात गुंतवणूकदारांनी 16% पेक्षा जास्त नफा कमावला आहे. मागील 6 महिन्यांतर, युनायटेड स्पिरिट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 829 रुपयेवरून वाढून 1040 रुपयेवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 26 टक्के नफा कमावला आहे.
या वर्षी 2 मार्च 2023 रोजी, युनायटेड स्पिरिट्स कंपनीचे शेअर्स 735 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 40 टक्के नफा कमावला आहे. 28 मार्च 2023 रोजी, युनायटेड स्पिरिट्स कंपनीचे शेअर्स 740 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांना तब्बल 300 रुपये अधिक नफा मिळाला आहे.
मागील 1 वर्षातर युनायटेड स्पिरिट्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर महिळ 5 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी, युनायटेड स्पिरिट्स कंपनीचे शेअर्स 465 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर या किमतीवरून गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 140 टक्के नफा कमावला आहे.
युनायटेड स्पिरिट्स ही भारतातील सर्वात मोठी वाईन आणि बिअर निर्माता कंपनी मानली जाते. 9 नोव्हेंबर 2001 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 15,800 टक्के नफा कमावला आहे.
जून 2023 तिमाहीमधील निकालानंतर युनायटेड स्पिरिट्स कंपनीजीच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, युनायटेड स्पिरिट्स कंपनीने 2668 कोटी रुपये सेल्स केला होता. मागील वर्षाच्या तुलनेत सेल्समध्ये 29 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत युनायटेड स्पिरिट्स कंपनीचा नफा 714 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 130 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत युनायटेड स्पिरिट्स कंपनीचा PAT 477 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. युनायटेड स्पिरिट्स कंपनीच्या जबरदस्त आर्थिक निकालामुळे स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock today on 22 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं