Multibagger Stocks | 1 वर्षात या शेअरमध्ये 115 टक्क्यांची वाढ, आता प्रसिद्ध गुंतवणूकदाराने विकत घेतला स्टॉक

Multibagger Stocks | शेअर बाजारात असे खूप शेअर आहेत ज्यात पैसे लावून गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमावला आहे. असाच एक ब्रँड शेअर आहे, मॉन्टे कार्लो. गेल्या दोन वर्षात मॉन्टे कार्लो कंपनीच्या स्टॉकची किंमत 163 रुपयांवरून 766 रुपयांपर्यंत वाढली आहे.
मॉन्टे कार्लो कंपनी फॅशनच्या व्यवसायाशी संबंधित आहे. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत 163 रुपयांवर ट्रेड करत होता आता त्याची किंमत 766 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनीही या शेअरमध्ये जबरदस्त गुंतवणूक केली आहे. डॉली खन्ना अशा शेअरवर गुंतवणूक करण्यासाठी प्रसिद्ध आहे ज्याची बाहेर क्वचितच चर्चा होते. यामुळेच लोक वेळोवेळी डॉली खन्नाचा पोर्टफोलिओ पाहण्यासाठी उत्सुक असतात. 2022 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत डॉलि खन्ना यांनी विविध कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे असे त्यांच्या पोर्टफोलओ मधून दिसते. जिथे एकीकडे डॉली खन्नाने तिच्या पोर्टफोलिओमध्ये 5 नवीन स्टॉक्स जोडले आहेत, तर दुसरीकडे,15 कंपन्यांच्या शेअर्समधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. मात्र डॉलि खन्ना यांनी मॉन्टे कार्लोच्या शेअर्सच्या बाबतीत सकारात्मक विश्वास व्यक्त केला आहे.
मॉन्टे कार्लो शेअर्सची वाटचाल :
मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांनी काही ठराविक शेअर मधून भरपूर नफा मिळवला आहे अशा काही ठराविक शेअरमध्ये मॉन्टे कार्लो कंपनीचा समावेश आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी कंपनीचा शेअर किंमत 355 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 766 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात शेअर्समध्ये सुमारे 115% ची वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत 163 रुपयांवरून 766 रुपयांपर्यंत पोहोचली असून या शेअरने मागील दोन वर्षांत गुंतवणूकदारांना 370% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
डॉली खन्नाची मॉन्टे कार्लोमध्ये गुंतवणूक :
एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत डॉली खन्ना यांनी मॉन्टे कार्लो लि.च्या शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे असे प्रसिद्ध झालेल्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार समोर आले आहे. कंपनीच्या शेअर होल्डर यादीत त्यांचे नाव आले आहे. डॉली खन्नाकडे एप्रिल ते जून 2022 तिमाही पर्यंत मॉन्ट कार्लो कंपनीचे एकूण 3,69,032 शेअर्स होते. म्हणजेच त्यांची कंपनीतील एकूण हिस्सेदारी 1.78% होती. सेबीच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराकडे कोणत्याही कंपनीत एक टक्क्यांहून अधिक भागीदारी असते, तेव्हा त्यांचे नाव वैयक्तिक भागधारकांच्या यादीत प्रसिद्ध करावे लागते. त्यामुळे डॉली खन्नाने ह्या स्टॉकामधे गुंतवणूक केली हे आपल्याला समजले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Stocks monte Carlo is trading on high price on 22 July 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं