Multibagger Stocks | मस्तच कमाई होतेय, या शेअरने 1 वर्षात 425 टक्के परतावा दिला, शेअर स्वस्तात खरेदी करता येणार, कारण पहा

Multibagger Stocks | जेव्हा मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स बाजारभावापेक्षा कमी दराने मिळतात तेव्हा गुंतवणूकदारांना जबरदस्त पैसे कमावण्याची संधी मिळते. हिल्टन मेटल ही एक स्मॉल कॅप कंपनी असून अल्पकाळात आपल्या भागधारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आता कंपनी पुन्हा एकदा आपल्या गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत शेअर खरेदी करण्याची संधी देणार आहे. कंपनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स-राईट्स इश्यू म्हणून ट्रेडिंग करत होती. या राइट इश्यूची रेकॉर्ड तारीख 20 ऑक्टोबर 2022 रोजी निश्चित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊ या राइट्स इशूची तपशीलवार माहिती
राईट्स इश्यू :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटा नुसार या कंपनीने 2:5 या प्रमाणात राइट्स इश्यू आणण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी शानदार राहिली आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत NSE निर्देशांकावर 14 रुपयेवरून 73.25 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 425 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे.
राइट्स इश्यूचे तपशील :
1) राइट इश्यूची किंमत काय आहे? : कंपनीने आपल्या राइट इश्यूसाठी प्रति शेअर 55 रुपये किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच कंपनी सध्याच्या 73 रुपयांच्या किमतीच्या तुलनेत 18 रुपयांनी स्वस्त दराने शेअर्स विकणार आहे.
2) रेकॉर्ड डेट कधी आहे? : कंपनीने दिलेल्या स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर करण्यात आली आहे.
3) राइट इश्यूचा आकार किती असेल ? : कंपनी राइट इश्यूमध्ये 60 लाख शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणणार आहे.
4) राइट्स इश्यूमधून किती पैसे गोळा करण्याचे लक्ष्य आहे? : कंपनीने या राइट्स इश्यूद्वारे 33 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Hilton metal company has declared rights issue for existing shareholders on 20 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं