Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1100 टक्के परतावा दिला, तज्ञांचा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला

Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता, त्यामुळे शेअर बाजारात पडझड सुरू झाली होती. अशा काळातही काही कंपन्यांनी आपल्याला गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळवून दिला होता. या काळात बेंगळुरू स्थित रियाल्टर ब्रिगेड एंटरप्रायझेसच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. दहा वर्षापूर्वी हा स्टॉक 41.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 10 वर्षांत या शेअरमध्ये 1,136 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत सध्या 507.35 रुपयांवर गेली आहे.
उच्चांकी आणि नीचांकी किंमत :
12 मे 2022 रोजी रियाल्टर ब्रिगेड एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 385.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअरने 585 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली होती. मागील वर्षीच्या किमतीच्या तुलनेत शेअरमध्ये सध्या 13 टक्क्यांची घसरण झाली आहे. देशातील काही प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म या स्टॉकबाबत सकारात्मक असून त्यांनी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 42 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मोतीलाल ओसवाल यांना रियल इस्टेट व्यवसायात आणखी वाढ अपेक्षा आहे, कारण रियाल्टर ब्रिगेड व्यवस्थापन येणाऱ्या पाच ते सहा वर्षांत 35 दशलक्ष चौरस फूट जमिनीची नोंदणी करणार आहेत. “मागील चार वर्षांत रियाल्टर ब्रिगेडने सुधारित रियल इस्टेट धोरणाद्वारे आपल्या व्यवसायातील सर्व पैलूंचा विस्तार केला आहे, ज्याचे सकारात्मक फळ देत आता त्यांना प्रॉफिटच्या रूपाने भेटत आहे.
मोतीलाल ओसवाल यांना आर्थिक वर्ष 2012-24 मध्ये ब्रिगेड एंटरप्रायझेसची भड्यातून मिळणारे उत्पन्न 15 टक्के CAGR दराने वाढून 750 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. भाडेतत्त्वावरील वसुलीतून मिळणारे उत्पन्न हे या कंपनीचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकसाठी 720 रुपयांची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे. ब्रोकरेज फर्मला येणाऱ्या काळात स्टॉकमध्ये 42 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Realtor Brigade Enterprises share price return on investment on 15 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं