Multibagger Stocks | पुढील 1 वर्षात किमान 100 टक्के पेक्षा जास्त परतावा हवा आहे? हे 4 शेअर्स पैसा दुप्पट करतील

Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदार नेहमी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत असतात. मल्टीबॅगर्स स्टॉक असे स्टॉक असतात, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे विशिष्ट कालावधीत दुप्पट-तिप्पट वाढवतात. सध्या जर तुम्हीही अशा मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी आतपर्यंत लोकांना मजबूत परतावा दिला आहे, आणि पुढील 1 वर्षात किमान 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देऊ शकतात.
1. रेपको होम फायनान्स :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने 16 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘रेपको होम फायनान्स’ कंपनी मालमत्तेच्या गुणवत्तेवर नवीन एमडी आणि सीईओ ‘के स्वामीनाथन’ यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. सध्या कंपनीची व्यवसाय फ्रँचायझी अंडरव्हॅल्यू आहे. म्हणून ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकसाठी 470.00 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत शेअरच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा 161.47 टक्क्यांनी जास्त आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के वाढीसह 183.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2. श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी’ कंपनी आपल्या व्यवसाय क्षमतांचा वेगाने विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कंपनीने नुकताच स्टेनलेस स्टील आणि कलर कोटेड स्टील व्यवसायात प्रवेश केला केला आहे, याचा मजबूत फायदा कंपनीला पुढील काळात होऊ शकतो. ब्रोकरेज फर्म ‘श्याम मेटॅलिक्स’ कंपनीच्या स्टॉकवर 570.00 रुपये लक्ष किंमत दिली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 116.85 टक्क्यांनी वाढू शकतो. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.25 टक्के वाढीसह 271.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
3. दिलीप बिल्डकॉन लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने 11 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘दिलीप बिल्डकॉन लिमिटेड’ कंपनीचे डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले होते. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 100 अब्ज महसूल संकलित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 265.4 कोटी आहे. ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीच्या स्टॉकवर ब्रोकरेज फर्मने 355.00 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात 110.18 टक्क्यांनी वाढू शकतो.
4. बार्बेक्यू नेशन :
ब्रोकरेज फर्म एडलवाईसने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘बार्बेक्यू नेशन’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. कंपनीचे डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल अपेक्षे प्रमाणे आले होते. आता कंपनीने आपल्या स्टोअरची संख्या अधिक वाढवली आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 च्या पहिल्या 9 महिन्यांत कंपनीने 27 नवीन स्टोअर्स लाँच केले आहेत. महागाई कमी झाल्याने लोकांकची खर्च करण्याची क्षमता वाढेल, आणि याचा फायदा कंपनीला काही प्रमाणात होऊ शकतो. ब्रोकरेज फर्मने ‘Barbeque Nation’ कंपनीच्या शेअरवर 1,275.00 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. महणजेच हा स्टॉक पुढील काळात 101.37 टक्क्यांनी वाढू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks recommended by Stock market expert for investment on 03 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं