Naukri Cut in 2023 | नोकऱ्यांच्या बाबतीत 2023 मध्ये 2008 पेक्षा वाईट काळ येतोय, अनेकांना माजी सुशिक्षित पीएम आठवणार?

Naukri Cut in 2023 | २०२२ साली जगातील बड्या कंपन्यांमध्ये टाळेबंदीचे प्रमाण खूप होते. अॅमेझॉन, गुगल, ट्विटर आणि अॅपलसारख्या कंपन्यांनी हजारो नोकऱ्या गमावल्या. ही तर केवळ सुरुवात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. येत्या 2023 साली आर्थिक मंदीमुळे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. २००८ मधील आर्थिक मंदी ही परिस्थितीपेक्षाही भयंकर असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 2022 मध्ये दीड लाखांहून अधिक लोकांना आयटी कंपन्यांमधील नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अजून जास्त लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं नाही, असं कंपन्यांनी म्हटलं आहे.
सन २००८ मध्ये नोकरी गमावलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा ही संख्या खूपच जास्त असू शकते, असा अंदाज आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सन २०२२ मध्ये ९८६ टेक कंपन्यांपैकी सुमारे १,५१,४६८ लोकांना काढून टाकण्यात आले. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक लवकरच टाळेबंदीची तयारी करत असल्याने ही संख्या आणखी वाढणार आहे. इतरही अनेक कंपन्या या मार्गाचा अवलंब करत आहेत.
२००८ साली आर्थिक मंदीने जगाचे कंबरडे मोडले
महामंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २००८च्या मंदीला २००७ साली सुरुवात झाली. त्यावेळी अमेरिकन लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते. यानंतर २००८ साली ६५ हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. २००९ साली जवळपास तेवढेच लोक बेरोजगार झाले. मात्र त्यावेळी केंद्रात स्वतः डॉ. मनमोहन सिंह जे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सुद्धा राहिले होते, त्यांच्या अनुभवातून केल्या गेलेल्या उपाय योजनांनी (पॉलिसी लेव्हल) देशाला तारलं होतं. मात्र सध्या 2022 बद्दल बोलायचे झाले तर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यानच दीड लाखांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून ही संख्या सतत वाढत आहे. विशेष म्हणजे यावर राष्ट्रीय दर्जावर पॉलिसी न करता केंद्र सरकार हजार – दोन हजार लोकांना सरकारी नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर हातात देण्याचे इव्हेन्ट रचून खोटा रोजगार निर्मितीचा देखावा करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण आता २०२३ मध्ये खरी मंदी सुरु होणार असून त्यामुळे लाखो तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.
रोजगार गमावण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे करोना महामारी ठरला होता आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना याबाबत कोणतीही ठोस तयारी केली नव्हती. त्याकाळातही केंद्र सरकार इव्हेन्ट करण्यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय पाश्चिमात्य देशांची आर्थिक परिस्थिती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळेही आगीत तेल ओतले गेले आहे. हेच कारण आहे की यावेळी केवळ आयटी कंपन्यांमध्येच नव्हे तर मीडिया, एडटेक, फूड सर्व्हिस आणि इतर अनेक क्षेत्रांमध्येही टाळेबंदी होत आहे. तसेच अर्थतज्ज्ञांच्या मते मंदीतून अजून ब्रिटन सावरलेला नसताना आता अमेरिकेत मंदी सुरु होणार असल्याचं म्हटलं जातंय. परिणामी, याचा मोठा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होणार असल्याचं म्हटलं जातं असून त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Naukri Cut in 2023 layoffs to continue in 2023 may cross level great recession 2008 check details on 19 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं