Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला कुटुंबाची या शेअरमधून जोरदार कमाई होतेय, अजून एका बातमीने शेअर तेजीत

Nazara Technologies Share Price | ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. परकीय गुंतवणूकदाराने जागतिक कराराद्वारे ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे लाखो शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवारी कंपनीने सेबीला याबाबत माहिती कळवली आहे.
दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमधे मोठी गुंतवणूक केली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 572.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणूक तपशील :
‘नजारा टेक्नॉलॉजी’ ही एक गेमिंग कंपनी आहे. ही कंपनी भारताबरोबरच आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतही व्यवसाय करते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Societe Generale ने ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमध्ये 33.83 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या फ्रेंच गुंतवणूक कंपनीने ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे 5.93 लाख शेअर्स 570 रुपये किमतीवी खरेदी केले आहेत. या परकीय गुंतवणुक कंपनी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे 0.89 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
दिग्गजांची गुंतवणूक :
राकेश झुनझुनवाला कुटुंबाने ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार 9,96 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. याशिवाय मनीष अग्रवाल यांनी देखील 1.43 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मोठ्या गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमध्ये म्युच्युअल फंडाने 5.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
तर परकीय गुंतवणूकदारांनी 8.52 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के घसरणीसह 560.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यात ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 7.55 टक्के कमजोर झाले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Nazara Technologies Share Price today on 15 May 2023
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं