NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC

NBCC Share Price | सरकारी नवरत्न कंपनी एनबीसीसी लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे. त्यानुसार एनबीसीसी इंडिया कंपनीला 368 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यामुळे शुक्रवारी एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सची जोरदार खरेदी करण्यात आली. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
368 रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी कंपनीने शेअर बाजाराला फायलिंगमध्ये माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला एकूण 368 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट आयआयटी रुरकी, पॉवरग्रिड आणि वाराणसी विकास प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झाले आहेत.
कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची डिटेल्स
एनबीसीसी कंपनीला आयआयटी रुरकीकडून २४.३८ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. उत्तराखंडच्या आयआयटी रुरकी येथील मेहता फॅमिली स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बांधकामासाठी हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ईआय, एचव्हीएसी, फायर फायटिंग, फायर अलार्म, लिफ्ट, ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम, सीसीटीव्ही आणि बीएमएस इन्स्टॉलेशन आणि डेव्हलपमेंट वर्क या कामाचा समावेश आहे.
वाराणसी विकास प्राधिकरणाने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ३०० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार कंपनीला इंग्लिसिया मार्गावर जवाहरलाल नेहरू कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडून ४४.३७ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार एम्स गोरखपूर येथे ५०० खाटांचे बहुमजली विश्राम सदन बांधण्याचे काम एनबीसीसी कंपनीला देण्यात आले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NBCC Share Price Friday 27 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं