Nexus Select Trust IPO | गुंतवणुकीसाठी धमाकेदार IPO ओपन झाला, ग्रे मार्केट मध्ये स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, गुंतवणूक केली?

Nexus Select Trust IPO | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट’ या रिअल इस्टेट कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 8 मे 2023 रोजी नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने 20 अँकर गुंतवणूकदारांकडून 1440 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने माहिती दिली आहे की, 20 अँकर गुंतवणूकदारांना कंपनीने 1440 कोटी शेअर्स प्रत्येकी 100 रुपये किमतीवर वाटप केले आहेत.
अँकर गुंतवणूकदारामध्ये अनेक दिग्गज :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनी IPO मध्ये अँकर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यात मॉर्गन स्टॅनले एशिया, संगती इंडिया मॉरिशस, एचडीएफसी ट्रस्टी, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, स्टार हेल्थ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एनपीएस ट्रस्ट, एसबीआय जनरल लाइफ इन्शुरन्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, यासारख्या मोठ्या कंपन्या सामील आहेत.
IPO तपशील :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 9 मे ते 11 मे 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. 16 मे 2023 रोजी कंपनी IPO शेअर्सचे वाटप करेल. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीच्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 95 रुपये ते 100 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये कंपनी 150 शेअर्स जारी करणार आहे. म्हणून रिटेल गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 15,000 रुपये जमा करावे लागतील.
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट GMP :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये 4 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. आधी हा स्टॉक 5 रुपये जीएमपी किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच जीएमपीमध्ये किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nexus Select Trust IPO today on 10 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं