NHPC Share Price | NHPC शेअर विक्रमी उच्चांकावरून 32% घसरला, ही स्वस्तात खरेदीची संधी आहे का - NSE: NHPC

NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे देऊन शॉर्ट टर्ममध्ये पैसे दुप्पट केले आहेत. मात्र, काही दिवसांपासून हा शेअर (NSE: NHPC) प्रचंड घसरला आहे. मागील तीन महिन्यांत NHPC शेअर विक्रमी उच्चांकी पातळीवरून ३२% घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
नोमुरा ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
मागील ९ महिन्यांत एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर १४४ टक्क्यांहून अधिक वाढून विक्रमी पातळीवर पोहोचला होता. केवळ ऑक्टोबर महिन्यात हा शेअर १५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मात्र, नोमुरा ब्रोकरेज फर्मने खरेदीची संधी असल्याचं म्हटलं आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.51% टक्के वाढून 80.14 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.76 टक्के घसरून 78.64 रुपयांवर पोहोचला होता.
नोमुरा ब्रोकरेज फर्म – कंपनी बाबत काय म्हटले?
ब्रोकरेज फर्म नोमुराच्या म्हणण्यानुसार, हायड्रो इलेक्ट्रिसिटीसाठी कॉस्ट प्लस ROE मॉडेल आणि केंद्र सरकारच्या वाढीव पाठबळामुळे एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या वाढीची मोठी शक्यता आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनी ही देशातील एकमेव PSU वीज निर्मिती कंपनी आहे जी पूर्णपणे हरित आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनीची जलविद्युत क्षमता ७ गिगावॅट आहे, जी देशाच्या एकूण जलविद्युत क्षमतेच्या सुमारे १५% आहे.
आता एनएचपीसी लिमिटेड कंपनी आर्थिक वर्ष 2028 पर्यंत क्षमता 12 गिगावॅटपर्यंत वाढविण्यावर काम करत आहे. ज्यामुळे एनएचपीसी लिमिटेड कंपनीचा बाजारातील हिस्सा 20 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तसेच एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे ८.३ मेगावॅटचे जलविद्युत प्रकल्प सध्या सर्वेक्षण आणि मंजुरीखाली आहेत. हे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर एनएचपीसी लिमिटेड कंपनीची एकूण जलविद्युत क्षमता सध्याच्या पातळीपेक्षा ३ पटीने वाढून २४.६ मेगावॅट होईल.
नोमुरा ब्रोकरेज फर्मचा अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘एनएचपीसी लिमिटेड कंपनीची EBITDA मार्जिन 4.71 टक्क्यांनी वाढून 55.8% होऊ शकते. चालू भांडवली खर्चामुळे मजबूत महसूल वाढीचा दृष्टीकोन आणि नफ्याच्या मार्जिनमधील विस्तारामुळे नोमुरा ब्रोकरेज फर्मला एनएचपीसी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी दिसत आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एनएचपीसी शेअरसाठी १७६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
वर्षभरात शेअर्सची वाटचाल कशी झाली
26 ऑक्टोबर 2023 रोजी NHPC लिमिटेड कंपनी शेअर 48.48 रुपयांवर होता. हा NHPC लिमिटेड कंपनी शेअरचा एक वर्षातील नीचांक होता. NHPC लिमिटेड कंपनी शेअर या नीचांकी पातळीवरून १५ जुलै २०२४ रोजी ९ महिन्यांत १४४% वाढून ११८.४५ रुपयांवर पोहोचला होता, जो NHPC लिमिटेड कंपनी शेअरचा विक्रमी उच्चांक होता. मात्र, NHPC लिमिटेड कंपनी शेअरची तेजी इथेच थांबली आणि हा शेअर या उच्चांकावरून ३२% घसरून 80.14 रुपयांवर आला आहे.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात NHPC कंपनी शेअर 11.20% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 60.28% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 236.72% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 21.15% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NHPC Share Price 25 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं