NMDC Share Price | PSU स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्ममध्ये देणार मोठा परतावा

NMDC Share Price | एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या एनएमडीसी कंपनीचे शेअर्स अनेक ब्रोकरेज फर्मच्या रडारवर आले आहेत. या कंपनीचे मार्च 2024 तिमाहीतील कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत आली आहे, मात्र स्टॉकमध्ये वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 4.19 टक्के वाढीसह 259.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञांच्या मते, एनएमडीसी स्टॉक अल्पावधीत 301 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक किमान 12 महिन्यांसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. 30 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 250 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढू शकतो. मार्च 2024 तिमाहीत एनएमडीसी कंपनीचा EBITDA 2130 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जे तज्ञांच्या अंदाजापेक्षा कमी होते.
वार्षिक आधारावर एनएमडीसी कंपनीचा EBITDA प्रति टन 1704 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2024-25 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा वाढू शकतो. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एनएमडीसी कंपनीचा EBITDA अंदाज 6 टक्के ते 9 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. नुकताच नुवामा फर्मने देखील एनएमडीसी स्टॉकची टारगेट प्राइस 280 रुपयेवरून वाढवून 301 रुपये केली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एनएमडीसी स्टॉकवर 300 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
मार्च 2024 तिमाहीत एनएमडीसी कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 37 टक्के घसरणीसह 1462 कोटी रुपये नफा नोंदवला आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 2277 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचा प्रॉफिट मार्जिन मार्च तिमाहीत 33 टक्के राहिला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 37 टक्के होता. मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 11 टक्क्यांच्या वाढीसह 6475 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 5851 कोटी रुपये होता. मार्च 2024 तिमाहीसाठी एनएमडीसी कंपनीने 1 शेअरच्या दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 150 टक्के म्हणजेच 1.5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NMDC Share Price NSE Live 31 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं