NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC

NTPC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट एक तास खुला होता. संध्याकाळी ६ वाजता स्टॉक मार्केट उघडताच मोठी तेजी दिसून (NSE: NTPC) आली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजी सह बंद झाले होते. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
एनटीपीसी शेअर – तज्ञांचा सल्ला
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनटीपीसी शेअरबाबत सांगितले की, ‘मागील 4 ट्रेडिंग सत्रांपासून एनटीपीसी शेअर आपल्या 50 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज रेझिस्टन्स झोनमध्ये आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी थोडा ‘वेट अँड वॉच’ करावा. एनटीपीसी शेअर ४१५ रुपयांच्या वर टिकून राहिल्यास पुढे अधिक वाढू शकतो. तोपर्यंत गुंतवणूकदारांसाठी ‘वेट अँड वॉच’ अशी परिस्थिती राहणार आहे. गुंतवणूकदारांनी NTPC शेअरसाठी ३९० रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. जर एनटीपीसी शेअर ३९० रुपयांच्या खाली गेल्यास तो पुढे ३७० रुपयांपर्यंत घसरेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
एनटीपीसी शेअरने किती परतावा दिला
बीएसई आकडेवारीनुसार, मागील 1 आठवड्यात NTPC कंपनीच्या शेअरमध्ये 2.64% वाढ झाली आहे. मात्र गेल्या १ महिन्यात हा शेअर 5.40% टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ६ महिन्यांत शेअरने 12.85% परतावा दिला आहे. गेल्या १ वर्षात NTPC कंपनी शेअरने 75.74% परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात NTPC शेअरने 238.97% परतावा दिला आहे.
गेल्या 3 वर्षात NTPC कंपनी शेअरने 206.40% परतावा दिला आहे. NTPC लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,98,872 कोटी रुपये आहे. NTPC शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 448.45 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 232.10 रुपये आहे.
कंपनी बद्दल
NTPC लिमिटेड कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एनटीपीसी कंपनीची स्थापना 1975 मध्ये झाली होती. एनटीपीसी लिमिटेड हा देशातील सर्वात मोठा ऊर्जा समूह आहे. NTPC लिमिटेड कंपनीची स्थापना भारत सरकारकडून वीज विकासाला गती देण्यासाठी करण्यात आली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NTPC Share Price 04 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं