Nykaa Share Price | नायका शेअर उच्चांक किंमत पातळीवरून 42 टक्के खाली, अजून प्रॉफिट बुकींग सुरू, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Nykaa Share Price | मागील काही दिवसांपासून नायका कंपनीच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. नायका कंपनीचे शेअर्स काल 144.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नायका कंपनीचे शेअर्स 248 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 42 टक्के खाली आले आहेत.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFI द्वारे नायका या फॅशन अँड ब्युटी ई-टेलर कंपनीला लार्जकॅप वरून मिडकॅप श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहेत. म्युच्युअल फंड संस्था दर सहा महिन्यांनी बाजार भांडवलाच्या आधारे शेअर्सचे वर्गीकरण करतात. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 143.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
AMFI संस्था शेअर बाजारातील टॉप 100 शेअर्सचे त्यांच्या मूल्यानुसार लार्जकॅप्स आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप असे वर्गीकरण करते. 101-250 रुपये दरम्यान किंमत असलेल्या शेअर्सना AMFI मिडकॅप स्टॉक मानते. तर टॉप 500 यादीतील शेअर्स स्मॉलकॅप्स स्टॉक मानले जातात. नायका कंपनीचा आयपीओ 1125 रुपये किमतीवर लाँच झाला होता.
नोव्हेंबर 2021 मध्ये नायका स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1125 रुपये निश्चित केली होती. तर स्टॉक 2000 रुपयेच्या वर सूचीबद्ध झाला होता. याचा अर्थ लिस्टिंगमधून गुंतवणूकदारांनी दुप्पट परतावा कमावला होता.
सध्या नायका कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यूच्या तुलनेत 87.2 टक्के कमजोर झाले आहेत. तर AMFI ने इतर अनेक दिग्गज स्टॉकची श्रेणी अवनत केली आहे. यात Nykaa, JSW Energy, Tata Elxsi, Indus Towers, Macrotech Developers, Info Edge यां सारख्या दिग्गज कंपन्यांना मिडकॅप श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तर मिडकॅप्स श्रेणीतील शेअर्स स्मॉलकॅप्समध्ये अवनत झालेल्या शेअर्समध्ये पिरामल फार्मा, टाटा टेली, फाइन ऑरगॅनिक, क्लीन सायन्स, डॉ लाल पॅथलॅब्स, ब्लू डार्ट एक्सप्रेस यासारख्या दिग्गज कंपनीचे स्टॉक सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nykaa Share Price today on 06 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं