Olectra Share Price | 7 रुपयाच्या शेअरने करोडोत परतावा दिला, शेअर आजही खरेदीला उत्तम, ऑर्डरबुक मजबूत

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 12792.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स नवीन ऑर्डर मिळाल्याने तेजीत वाढत आहेत.
मागील काही वर्षांत या कंपनीचे शेअर्स 7 रुपयेवरून वाढून 1200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1465 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 374.35 रुपये होती. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 0.38 टक्के घसरणीसह 1,228.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला वसई विरार शहर महानगरपालिकाकडून 40 इलेक्ट्रिक बसेची ऑर्डर देण्यात आली आहे. यासह कंपनीला बसचे देखभाल करण्याचे कंत्राट देखील देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक बसेसचे एकूण मुल्य 62.80 कोटी रुपये असेल.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी पुढील 7 महिन्यांत या ऑर्डरची पूर्तता करणार आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये 18.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
28 मार्च 2014 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 डिसेंबर 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 1272.60 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 17470 टक्के नफा कमावला आहे.
जर तुम्ही 28 मार्च 2014 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.79 कोटी रुपये झाले असते. मागील 3 वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरची किंमत 1070 टक्के वाढली आहे. तर या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 106.70 रुपयेवरून वाढून 1272.60 रुपयेवर पोहचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Olectra Share Price NSE 09 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं