PAN Aadhaar Link Fee Payment | बोंबला! पॅन आधार लिंक फी जमा करण्याबाबत नवे अपडेट, फक्त 25 दिवस उरले, नंतर भरा पैसा
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- PAN Aadhaar Link Fee Payment
- पॅन आणि आधार लिंक करणं का महत्त्वाचं
- पॅन लिंकच्या शुल्कात वाढ झाली का?
- पॅन लिंक फी जमा करण्याचा मार्ग काय आहे?

PAN Aadhaar Link Fee Payment | आर्थिक देखरेख ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी आयकर विभागाने सर्व पॅन वापरकर्त्यांना आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी अनेकवेळा मुदतवाढही देण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. अशा तऱ्हेने पॅन युजर्सनी 30 तारखेची वाट न पाहता आता ऑनलाइन फी जमा करून पॅनला आधारशी लिंक करावं.
पॅन आणि आधार लिंक करणं का महत्त्वाचं
प्राप्तिकर विभागाने पॅन वापरकर्त्यांना सांगितले आहे की, प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, सूट श्रेणीत न येणाऱ्या सर्व पॅनधारकांनी 30 जून 2023 पूर्वी आपला पॅन क्रमांक आधारशी जोडणे आवश्यक आहे. पॅन आणि आधार लिंक न केल्यास आयकर कायद्याच्या कलम 139 एए अंतर्गत पॅन रद्द करण्यात येणार आहे.
पॅन लिंकच्या शुल्कात वाढ झाली का?
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया मोफत होती. यानंतर पॅन युजर्सना 30 जून 2022 पर्यंत लिंक करण्याची संधी देण्यात आली होती, पण शुल्क कमी करून 500 रुपये करण्यात आले होते. त्यानंतर पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली असून त्यासाठी पॅन युजर्सना 1,000 रुपये विलंब शुल्क आकारण्यात आले होते. आता ३० जूनपर्यंत पॅन लिंक करायचे आहे, पण यावेळी शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
पॅन लिंक फी जमा करण्याचा मार्ग काय आहे?
प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटनुसार पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करता येईल.
१. पॅन आधार लिंक करण्यासाठी युजर्सला आधी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp किंवा एनएसडीएल पोर्टलवर जावे लागेल.
२. पॅन आणि आधार लिंक करण्याची विनंती सबमिट करण्यासाठी इनव्हॉइस नंबर/आयटीएनएस 280./आयटीएनएस 280 अंतर्गत येणाऱ्या प्रोसिडवर क्लिक करा.
३. आता लागू होणारा अँप्लिकेबल टॅक्स निवडा.
४. यानंतर १,००० रुपये (Fees) आणि एकाच चलनाखाली शुल्क भरण्यासाठी कन्फर्म करा
५. आता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची पद्धत निवडा.
६. यानंतर पॅन नंबर टाका, ठरलेले वर्ष सिलेक्ट करा आणि पत्ता टाका.
७. यानंतर कॅप्चा कोड भरून प्रोसीडवर क्लिक करा.
८. एकदा पैसे भरल्यानंतर करदाते पॅन-आधार लिंक करू शकतात.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: PAN Aadhaar Link Fee Payment check details on 05 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं