Paytm Share Price Today | होय! 70 टक्क्याने स्वस्त झालेल्या पेटीएम शेअरची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, तेजीची कारण कोणती?

Paytm Share Price Today | ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 668 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअरमधील आलेली ही तेजी एका बातमीनंतर पाहायला मिळाली आहे. खर तर पैमेंट्स आणि वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या ‘पेटीएम’ कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी शेअर होल्डिंग पॅटर्नबाबत माहिती सेबीकडे सादर केली आहे. त्यानुसार देशांतर्गत गुंतवणुक संस्थांबरोबरच ‘पेटीएम’ कंपनीमध्ये एफपीआयची शेअरहोल्डिंग कमालीची वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे. (One 97 Communications Ltd)
‘पेटीएम’ कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच झाला होता. कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत बँड 2150 रुपये निश्चित केली होती. मात्र ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर आजपर्यंत आपली IPO किंमत बँड स्पर्श करू शकले नाही. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 651.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
म्युच्युअल फंड आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांनी देखील ‘पेटीएम’ कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 1.9 टक्क्यांवरून वाढून 3.2 टक्क्यांवर पोहचली आहे. म्युचुअल फंडाची एकूण होल्डिंग तिमाही दर तिमाहीत 1 टक्क्यांनी वाढली आहे.
मिरे असेटची होल्डिंग कंपनीने आपली ‘पेटीएम’ कंपनीतील गुंतवणुक 1.1 टक्क्यांवरून वाढवून 1.8 टक्क्यापर्यंत नेली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार यांची गुंतवणूक 6.7 टक्क्यांवरून वाढून 11.5 टक्क्यांवर पोहचली आहे. तर FPI ने ‘पेटीएम’ कंपनीमध्ये आपली गुंतवणूक किंचित प्रमाणात वाढवली आहे. एफडीआय ने आपला वाटा 66 टक्क्यांवरून कमी करून 60 टक्केवर आणला आहे.
चीनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने जानेवारी 2023 आणि फेब्रुवारी 2023 मध्ये आपले संपूर्ण भाग भांडवल विकून गाषा गुंडाळला आहे. अँट फायनान्शियल कंपनीने ‘पेटीएम’ कंपनीचे 3.3 दशलक्ष शेअर्स विकले असून आपला हिस्सा 25 टक्क्यांवरून 24.94 टक्क्यांवर आणला आहे. तिमाही दर तिमाही आधारावर अँट फर्मचा वाटा अजूनही स्थिर पाहायला मिळत आहे.
पेटीएम कंपनीच्या सर्व मुख्य व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण वाढ पाहायला मिळत असून चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांची वाट गुंतवणुकदार आतुरतेने पाहत आहेत. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत पेटीएम कंपनीच्या महसुलात 42 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती, आणि कंपनीने 2.062 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Paytm Share Price Today on 21 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं