PCBL Share Price | कमाई करायची आहे? हा शेअर देईल 75 टक्के परतावा, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

PCBL Share Price | पीसीबीएल लिमिटेड कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकांल जाहीर केले आहेत, ज्यात कंपनीने अपेक्षांपेक्षा जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म पीसीबीएल लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून त्यात 75 टक्क्यांनी वाढू शकतो.
पीसीबीएल लिमिटेड कंपनीचा स्टैंडअलोन निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीत 90 कोटी रुपये होता. जो या मार्च 2023 तिमाहीत 13 टक्क्यांच्या वाढीसह 102 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचा महसूल मार्च तिमाहीत 13 टक्क्यांच्या वाढीसह 1,374 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च तिमाहीत पीसीबीएल लिमिटेड कंपनीने 36.84 टक्क्यांच्या वाढीसह 200.45 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 146.48 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता.
2022-23 या आर्थिक वर्षात पीसीबीएल लिमिटेड कंपनीने 444 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मंगळवार दिनांक 16 मे रोजी पीसीबीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.19 टक्के घसरणीसह 128.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.870 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 97.80 रुपये होती.
पीसीबीएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 7.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 33 रुपयेवरून वाढून 128.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत त्यांच्या गुंतवणूकदारांनी 300 टक्के नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 131.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
पीसीबीएल लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी ब्लॅक कार्बन उत्पादक कंपनी मानली जाते. मार्च तिमाहीच्या निकालानंतर अनेक ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने 16 मे रोजी जारी केलेल्या अहवालात पीसीबीएल लिमिटेड स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 180.00 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 40 टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म B & K सिक्युरिटीजने पीसीबीएल लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन स्टॉक 238 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | PCBL Share Price today on 18 May 2023
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं